हॉटेल रुममध्ये जाताच सर्वात पहिले 'या' गोष्टी करा चेक 

www.thodkyaat.com

हॉटेलमध्ये थांबल्यानंतर अनेक जणांचे खासगी क्षणाचे व्हिडीओ समोर आले आहेत. 

ब्लॅकमेलिंग प्रकरणात असे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं दिसून येतं. यामुळे अगोदरच सावध व्हा. 

हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तिथल्या इतर अनोळखी व्यक्तींना तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.  

रुममध्ये इतर दुसऱ्या बाजूने आत येण्याचा मार्ग तर नाही ना, याची पण खातरजमा करा. पडद्याआड काही आहे का, याची माहिती घ्या. 

रिसेप्शनवरुन किल्ली घेतल्यानंतर अनोळखी व्यक्तीला तुमच्या रुममध्ये घेऊन जाऊ नका. सलगी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीपासून सदैव सावध राहा. 

हॉटेलमध्ये तुमची रुम सुरक्षित ठिकाणी आहे का? तिथले फर्नीचर, दरवाजे व्यवस्थित लागतात की नाही, खिडक्यांना ग्रिल्स आहेत का?  हे पाहा.