दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती

Post office recruitment 2024 | तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. दहावी पास उमेदवार देखील भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

इंडिया पोस्टकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत तब्बल 35 हजार पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Post office recruitment 2024) करावा लागणार आहे.

पोस्ट ऑफिसकडून 35 हजार पदांसाठी भरती

इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात.याच साईटवर भरती संदर्भातील सखोल माहिती तुम्हाला प्राप्त होईल.18 ते 40 वयोगटातील (Post office recruitment 2024) उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फीस भरावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून इच्छुकांनी जराही वेळेचा व्यत्यय न करता लगेच अर्ज भरून टाकावा. 15 जुलैपासून याचे अर्ज सुरू होतील.

इतर अट कोणत्या?

-या भरती प्रक्रियेसाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 10वी गणित आणि इंग्रजीमध्ये चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.
-उमेदवारांकडे किमान 60 दिवसांच्या अभ्यासक्रमाचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
-उमेदवारांना त्यांच्या पोस्टल वर्तुळातील स्थानिक भाषेचे (Post office recruitment 2024) ज्ञान असणे आवश्यक आहे.
-यानंतर उमेदवार मिरीट लिस्टमध्ये आल्यानंतर कागदपत्रांची तपासणी होऊन सिलेक्शन केले जाईल.

News Title – Post office recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या-

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; बजेटमध्ये PF संदर्भात होणार मोठा निर्णय?

“मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या”; मराठा संघटनांची मागणी

राहुल गांधीही करणार विठू नामाचा गजर; शरद पवारांनी दिलं पंढरपूर वारीचं निमंत्रण

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; शिक्षण फक्त दहावी

गणेशोत्सवाला एसटीने कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!