प्रेमीयुगुलांसाठी पावसाळ्यात ‘ही’ ठिकाणे आहेत पर्यटनाची बेस्ट ऑप्शन्स!

Monsoon travel | पावसाळा म्हटलं की, सगळीकडे निसर्गाची हिरवी चादर पाहायला मिळते. वातावरणात एक आल्हाददायक सुगंध पसरलेला असतो. चौहीकडे सुंदर नजारे डोळ्यांत साठवणारे असतात. डोंगराळ प्रदेशात तर पावसाळ्यात जायची एक वेगळीच मज्जा  असते. त्यात तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर, अशा ठिकाणी पार्टनरला घेऊन नक्कीच जायला हवे. निसर्गाचं सौंदर्य एक वेगळाच माहोल या काळात तयार करते. तुमची ट्रीप कायम स्मरणात राहील, यासाठी तुम्हाला असे काही स्थळ सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन जाऊ शकता.

‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या

लडाख : पावसाळ्यात लडाखमध्ये खूप सुंदर नजारे बघायला मिळतात. लडाख म्हटलं तर निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग. लडाखचा पीक सीझन जून ते सप्टेंबर असा असला तरी, जर तुम्ही तुमची ट्रीप लेहमधून जाण्यासाठी शेड्यूल केली, तर तुम्ही गर्दी टाळाल आणि तुम्हाला ट्रीपचा पूर्ण आनंद घेता येईल.

केरळ : पावसाळ्यात केरळमध्ये भेट द्यायलाच हवी. केरळमधील (Monsoon travel ) काही सुंदर पर्यटन स्थळं जसं की कोची, कोवलम आणि कोझिकोड सारखी ठिकाणे आहेत. पावसामुळे ही स्थळे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात.

शिमला : वास्तुकला आणि पर्वतीय दृश्यांसाठी शिमला पर्यटकांची पहिली पसंती आहे. येथील बर्फाच्छादित पर्वतांचा नजारा डोळ्यात भरणारा असतो. त्यामुळे या काळात तुम्ही इथे भेट देऊ शकता.

ऋषिकेश : हरिद्वार हे ऋषिकेश म्हणून ओळखले जाते. हे शहर योगाचे शहर म्हणून जगभर ओळखले जाते. ऋषिकेशमध्ये 35 प्रेक्षणीय स्थळे आहेत.ऋषिकेशमधील विविध घाटांवर गंगा आरती केली जाते. त्यावेळी त्रिवेणी घाट येथील गंगा आरती विशेष प्रचलित आहे.

माउंट अबू : वैविध्यपूर्ण वनस्पती आणि चित्तथरारक लँडस्केपमुळे लोक या छोट्याशा शांत हिल स्टेशनकडे आकर्षित होतात. माउंट अबूमध्ये भेट देण्याच्या ठिकाणांपैकी, इतिहास (Monsoon travel ) आणि स्थापत्यशास्त्राने समृद्ध असलेल्या भव्य प्राचीन वास्तू आहेत.राजस्थानमध्ये असलेल्या या ठिकाणी जुलैमध्ये विशेष भेट देतात.

News Title –  Monsoon travel 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

“राज्य सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ..”; नाना पटोले यांचा खोचक टोला

बीड कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘या’ आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी!

“डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन”; लंके समर्थकांनी बॅनरद्वारे विखे पाटलांना डिवचलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार घडवणार देवदर्शन, एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

‘या’ दिग्गज खेळाडूने टीम इंडियाबद्दल केली धक्कादायक भविष्यवाणी!