पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून कोकणातील पर्यटन स्थळ होणार बंद

On: May 24, 2026 6:02 PM
Kokan Tourism Closed
---Advertisement---

Kokan Tourism Closed | कोकण (Konkan) किनारपट्टीवर पावसाळ्याची चाहूल लागताच प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवण (Malvan) बंदर परिसरात 26 मे 2026 पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. समुद्रातील वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने (Maharashtra Maritime Board) ही कारवाई केली आहे.

सिंधुदुर्ग किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्स बंद :

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आदेशानुसार 26 मेपासून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मालवण बंदर क्षेत्रातील सर्व पर्यटनविषयक जलसेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort) प्रवासी वाहतूक, बोटिंग, स्कूबा डायव्हिंग आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा समावेश आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन एस.टी. उगालमुगले (Captain S.T. Ugalmugale) यांनी याबाबत सर्व बंदर निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांना अधिकृत आदेश दिले आहेत.

‘इनलँड व्हेसल्स ॲक्ट, 1197’ अंतर्गत नोंदणीकृत सर्व बोटी आणि जलवाहनांना मान्सून काळात आपले व्यावसायिक उपक्रम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र खवळलेला असताना पर्यटन सुरू ठेवल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने मालवण परिसरातील विविध पर्यटन संस्था आणि बोट चालकांना थेट सूचना दिल्या आहेत.

Kokan Tourism Closed | 31 संस्थांना प्रशासनाचा इशारा :

मालवण बंदर विभागाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली असून एकूण 31 संस्था, पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था (Shivshakti Jalparyatan Sanstha) चिवला, तारकर्ली (Tarkarli), देवबाग (Devbag) आणि दांडी (Dandi) येथील बोटिंग संघटनांचा समावेश आहे. स्थानिक स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांनाही आदेशांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोकण किनारपट्टीवरील पर्यटन सेवा बंद केल्या जातात. मागील वर्षी 20 मेपासून पर्यटन हंगाम थांबवण्यात आला होता. यावर्षी अधिकृत बंदी 26 मेपासून लागू होणार आहे. सध्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने मालवणच्या दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र, हवामानातील बदल आणि पावसाळी परिस्थितीमुळे पुढील काही महिन्यांसाठी जलपर्यटन पूर्णपणे थांबणार आहे.

News title : Malvan Tourism Closed From May 26

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now