नवरा भाजपकडून, घटस्फोटित बायको तृणमूलकडून उभी, पाहा कुणाचा झाला विजय

lok sabha result 2024 | यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच मतदार संघामध्ये कुटुंबातील व्यक्तीच एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे दिसून आलं. महाराष्ट्रात पवार कुटुंब आणि बारामती लोकसभा मतदार संघ प्रचंड चर्चेत होता. येथे पवार विरोध पवार असा संघर्ष झाला. भावाने बहिणीविरोधात येथे प्रचार केला.

बारामतीमध्येराष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंजक झाली. या निवडणुकीत अजित पवार यांनी बहीण सुळे यांच्या विरोधात प्रचार केला होतं. अशात सध्या अजून एका मतदार संघाची चर्चा होते आहे.

पश्चिम बंगालमध्ये पती-पत्नी लढले विरोधात

पश्चिम बंगालच्या बिष्णुपूर मतदारसंघात घटस्फोटित पती-पत्नीच आमने-सामने होते. या लढतीत पतीचा निसटता विजय झाला. पण, दोघेही सध्या देशभर चर्चेत आहेत. बिष्णुपूर मतदारसंघात (lok sabha result 2024) हा प्रकार घडला.

येथे भाजपने सौमित्र खान यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात पूर्वाश्रमीची पत्नी सुजाता मंडल या तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित होत्या. ही लढत अतिशय अटीतटीची झाली.

हरियाणामध्येही सासऱ्याच्या विरोधात उभ्या होत्या दोन सुना

या लढतीमध्ये भाजपचे सौमित्र खान यांनी अवघ्या 5,567 मतांनी विजय मिळविला. त्यांनी घटस्फोटीत पत्नी सुजाता मंडल यांचा पराभव केला. या लढतीची राज्यात सर्वत्र चर्चा होती. हरियाणामध्ये (lok sabha result 2024) देखील अशीच रंजक लढत झाली.

येथे सासऱ्याच्या विरोधात थेट दोन सुना निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. या निवडणुकीचा निकालही अत्यंत धक्कादायक लागला. ही जागा होती हरियाणातील हिसारची. येथे चौटाला कुटुंबीय एकमेकांविरोधात लढले. एवढे सगळे लढूनही येथे सर्वांच्या हाती अपयश आलं.

News Title – lok sabha result 2024 soumitra khan vs sujata mandal

महत्त्वाच्या बातम्या-

सासऱ्याच्या विरोधात उभ्या होत्या दोन सुना, अत्यंत धक्कादायक लागला निकाल

पिपाणीमुळे तुतारीला मोठा फटका!, समोर आलेले आकडे अत्यंत धक्कादायक

पराभव लागला जिव्हारी; आणखी एका भाजप नेत्याने दिला राजीनामा

भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याचा परिणाम, शेतकरी कर्जमाफी होणार?

राज्यात 26 मराठा खासदार, पाहा इतर जातींचे किती खासदार आले निवडून