“लाडकी बहीण योजनेची भीक नको, 1500 रूपयांमध्ये संसार होणार आहे का?”

Ladki Bahin Yojana | नुकताच राज्याचा अर्थसंकल्प पार पडला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी योजनांचा वर्षाव करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र मिळवण्यासाठी महिला तहसील कार्यालयाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रूपयांचा महिना आर्थिक लाभ होणार आहे. अशातच आता एका महिला शेतकऱ्याने सवाल उपस्थित केला आहे. (Ladki Bahin Yojana)

गायी सांभाळाव्यात की गायी शासनाकडे सांभाळायला द्याव्यात?

सविता पोखरकर असं एका महिला शेतकऱ्याचं नाव आहे. आंबेगाव तालुक्यात दूध परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सविता पोखरकर यांनी महिला शेतकरी यांची समस्या माजी खासदार आणि शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्या समोर मांडली आहे. त्यावेळी त्यांनी आम्ही गोठ्यातल्या गायी सांभाळाव्यात की गोठ्यातील गायी शासनाकडे सांभाळायला द्याव्यात, असा सवाल केलाय.

आमच्या दुधाला अनुदान नको तर दुधाला हमीभाव द्या, असं आवाहन सविता पोखरकर या महिला शेतकऱ्याने राजू शेट्टी यांना केलं आहे. दुधाला 22 ते 23 रुपये भाव आणि त्यात गायी आणि म्हशींवर लम्पीसारख्या आजाराचं संकट असल्याचं सविता पोखरकर म्हणाल्या आहेत.

खाद्यासाठी होणाऱ्या खर्चातून अर्धे पैसे मिळत नाही. त्यामुळे आमच्या गोठ्यातील गायी या गोठ्यातच ठेवाव्यात की त्या गायी सरकारकडे सांभाळायला द्याव्यात हेच कळत नाही. दुधाला अनुदान नको दुधाला हमीभाव द्या. आमचं जगणं सुसह्य करा, अशी मागणी पोखरकर यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) देखील भाष्य केलं आहे.

लाडकी बहीण योजनेवर शेतकरी महिलेचं भाष्य

आम्ही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुली आहोत. आम्ही कष्ट करू शकतो आणि सरकार आम्हाला लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) काढून 1500 रुपयांची भीक देत आहे. या 1500 रुपयात संसार होणार आहे का…?, असा सवाल त्यांनी केला आहे.

News Title – Ladki Bahin Yojana Over Lady Farmer Angry On State Government

महत्त्वाच्या बातम्या

फळभाज्यांचे दर कडाडले; भाव गेले थेट शंभरी पार

दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; बजेटमध्ये PF संदर्भात होणार मोठा निर्णय?

“मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या”; मराठा संघटनांची मागणी

राहुल गांधीही करणार विठू नामाचा गजर; शरद पवारांनी दिलं पंढरपूर वारीचं निमंत्रण