‘शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केल्यावर…’; कंगना रणौतच्या प्रकरणात बजरंग पुनियाची उडी

Kangana Ranaut | बॉलिवूडची अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) नुकतीच एका कारणाने चर्चेत आली आहे. तिला चंदीगड विमानतळावर एका महिला CISF सेक्युरीटी गार्डने कानशिलात लगावली असल्याची घटना काल दुपारी घडली होती. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे देशात काही ठिकाणी कंगनाची बाजू घेतली जात आहे. तर काही ठिकाणी कंगनाने केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात येताना दिसत आहे.

CISF सुक्युरीटी गार्ड म्हणून काम करणारी महिला ही एका शेतकरी कुटुंबातील महिला आहे. याचपार्श्वभूमीवर कंगनाने शेतकरी बांधवांवर खालच्य़ा पातळीवर वक्तव्य केलं होतं. त्याचा महिलेला राग होता. त्यामुळे महिलेनं कंगना राणौतच्या कानशिलात लगावली होती. याप्रकरणावर देशातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

बजरंग पुनिया हा एक कुस्तीपटू आहे. भाजप नेते ब्रिजभूषणविरोधात त्याने याआधी उपोषण केलं होतं. महिला कुस्तीपटूंवर ब्रिजभूषणने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलांनी केला होता. ब्रिजभूषणवर कोणतेही गुन्हे दाखल केले जात नसल्याचं सांगितलं गेलं. याचा निषेध म्हणून बजरंग पुनियाने ब्रिजभूषणविरोधात आंदोलन केलं होतं. आता त्यानेच कंगनाच्या (Kangana Ranaut) कानशिलात लगावलेल्या प्रकरणावर ट्विट करत हल्लाबोल केला आहे.

बंजरंग पुनियाचं ट्विट

बजरंग पुनियाने आपल्या (X) हँडेलवर ट्विट करत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. जेव्हा शेतकरी महिलांना वाईट बोललं जात होतं तेव्हा तुमची नौतिकता कुठे गेली होती?, असा सवाल त्याने आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे. शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केल्यावर शांती पाठ शिकवण्यासाठी पुढे आलेत. दरम्यान, बजरंग पुनियाच्या या पोस्टमध्ये त्याने सराकरलाही सुनावलं आहे. 

कंगनाच्या कानशिलात लगावली

नवनिर्वाचित भाजपच्या खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) काल चंदीगडहून दिल्लीला रवाना झाली होती. त्यावेळी तपासणी कक्षाजवळ असलेल्या एका महिला CISF सेक्युरीडी गार्डने कंगनाच्या कानशिलात लगावली होती. कंगनाने मागे शेतकऱ्यांबाबत वक्तव्य केलं होतं. त्यामुळे CISF महिलेने कंगनाच्या (Kangana Ranaut) कानशिलात लगावली.

दरम्यान, कंगनाला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली. कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचारसभा घेतल्या. मतदारांचा विश्वास मिळवत तिने लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विजय मिळवला.

News Title – Kangana Ranaut Slapped At Chandigarh Airport Incident On Wrestler Bajrang Puniya x tweeter Post

महत्त्वाच्या बातम्या

‘जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल तेव्हा…’; सलमान खानचं वक्तव्य चर्चेत

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

कंगनाच्या कानाखाली लगावणाऱ्या CISF महिलेला थेट बॉलिवूडकडून ऑफर

“बरं झालं शिवरायांच्या काळात…”, शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता

“राम मंदिर तर बांधलं पण, शहरवासीयांचं जीवन..”; BJP च्या अयोध्येतील पराभवानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट