नागरिकांनो सावधान! देशातील ‘या’ भागांना गारपिटीचा इशारा

On: May 24, 2026 5:38 PM
IMD Weather Alert
---Advertisement---

IMD Weather Alert | देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. उत्तर भारत, मध्य भारत आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये उष्णतेसोबतच मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर भारतात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा :

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील सात दिवस उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहू शकते. मात्र, 29 मेनंतर काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये 29 आणि 30 मे रोजी गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशातही 28 आणि 29 मेदरम्यान अशाच प्रकारचे हवामान राहू शकते.

गेल्या 24 तासांत उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 43 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले. पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि ईशान्य भारत वगळता बहुतांश भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhand) येथे 24, 25 तसेच 28 ते 30 मेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 29 मे रोजी तर जम्मू-काश्मीरमध्ये 24 मे रोजी गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Weather Alert | दक्षिण आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता :

ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाम (Assam), मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland), मणिपूर (Manipur) आणि मिझोराम (Mizoram) येथे 24 आणि 25 मे रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि त्रिपुरा (Tripura) येथेही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. केरळ (Kerala), लक्षद्वीप (Lakshadweep), तामिळनाडू (Tamil Nadu), पुदुच्चेरी (Puducherry) आणि अंतर्गत कर्नाटक (Karnataka) येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. किनारी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तेलंगणा (Telangana) आणि रायलसीमा भागातही वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये 24 मे रोजी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News title : IMD Hailstorm Rain Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now