अखेर युद्ध थांबलं! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

On: March 23, 2026 7:28 PM
Donald Trump
---Advertisement---

Donald Trump | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील काही लष्करी कारवायांवर तात्पुरता ब्रेक लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जगभरातील तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला होता. मात्र आता दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी इराणवरील काही हल्ले स्थगित करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. (US Iran conflict update)

इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित :

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली आहे. या चर्चेमुळे मध्यपूर्वेतील संघर्षाचे समाधान शोधण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी संरक्षण विभागाला आदेश देत इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्यास सांगितले आहे.

ट्रम्प यांच्या मते हा निर्णय सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या यशावर अवलंबून असेल. आगामी काही दिवसांत चर्चा यशस्वी झाल्यास संघर्ष पूर्णपणे थांबण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Donald Trump | इराणची प्रतिक्रिया; चर्चेचा दावा फेटाळला :

दरम्यान, ट्रम्प Donald Trump) यांच्या घोषणेनंतर इराणकडून वेगळीच प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते Ebrahim Rezaei यांनी अमेरिकेच्या या दाव्याला फेटाळून लावले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की इराण आणि अमेरिकेमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. (Donald Trump Iran war news)

इराणकडून आलेल्या या प्रतिक्रियेमुळे परिस्थिती अजूनही पूर्णपणे शांत झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जागतिक स्तरावर काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातही या बातमीनंतर सकारात्मक हालचाल दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

News title : Donald Trump Iran War Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now