“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांचं लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या”

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना गंभीर इशारा दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये फडणवीस यांना ठाकरेंनी केलेल्या टिकेबद्दल प्रश्न करण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस यांनी सर्वच टीकेचा समाचार घेतला.

“उद्धव ठाकरे इतकं वायफाळ बोलतात. त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत टीका केली.मी त्याच्याकडेही लक्ष देत नाही.पण,जर मी त्यावर बोलायचं ठरवलं ना तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.पण, मी बोलत नाही”, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

“उबाठा सेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे?”

“उद्धव ठाकरेंची भाषा ही पक्ष प्रमुख पदाला अशोभनीय आहे. महाराष्ट्रातला प्रमुख नेता म्हणून मला ओळखलं जातं. त्यामुळे मी माझा स्तर ठेवलेला आहे.”, असा टोला देखील यावेळी फडणवीस यांनी लगावला.

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मुस्लिम मतांवर देखील भाष्य केलं. “उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं, मुंबईत आपला मराठी मतांचा टक्का कमी झालाय, याची भरपाई कुठून करता येईल?, त्यावेळी मुस्लिम मतांवर त्यांचं लक्ष गेलं. मुस्लिमांच लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या. त्यांच्या पायावर लोळण घातली की, भरपाई करता येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतंय.”, असं फडणवीस (Devendra Fadnavis ) म्हणाले.

“…तर मी निवृत्ती घेतली असती”

पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक टिपू सुल्तान जयंती साजरी करणं सुरु केलं. त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे दिले, हे चुकीचच होतं. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हे खपवून घेतल नसतं. आता त्यांचं लांगुलचालन या स्तराला पोहोचलय की, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांचा स्टार प्रचारक बनलाय, अशी टीका फडणवीस यांनी केली.

इतकंच नाही तर पुढे फडणवीस म्हणाले की, “उबाठा सेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे?, अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण. त्यावर साधा निषेधाचा शब्द नाही, हे लांगुलचालन स्पष्टपणे दिसतय. निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, पण अशी वेळ आली असती, एखादी निवडणूक हरावी लागतेय, म्हणून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरावं लागेल, तर मी निवृत्ती घेतली असती.”,असं म्हणत देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

News Title – Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांचं टेन्शन वाढलं, बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार होणार लढत?

मोठी बातमी! ‘या’ तारखेला लागणार बारावीच्या निकाल?; बोर्डाकडून महत्वाची अपडेट

“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?

राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा

“ईडीने जप्त केलेले पैसे मी गोरगरिबांना देणार”, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य